HW Marathi
राजकारण

चंद्राबाबूंच्या उपोषणादरम्यान एकाची आत्महत्या

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न देण्याच्या सरकारच्या भूमिकेबद्दल निषेध नोंदविण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज (११ फेब्रुवारी) दिल्लीत एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली. मात्र, त्यांच्या एकदिवसीय उपोषणादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आंध्र भवनाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्या केली असून येथे सुसाईड नोटदेखील सापडली आहे. आत्महत्या करणारी ही व्यक्ती आंध्रची रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मजीद मेमन यांच्यासह अनेक नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. नायडू यांनी अनेकदा आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी मागणी केली आहे. तेलगू देसम पक्षाच्या बैठकीत या उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.

Related posts

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

News Desk

अयोध्येत गेल्याने त्या दोघांना ‘राम’ पावले असावेत !

News Desk

अशोक चव्हाण यांचा दावा खोटा, विधानसभा बरखास्त होणार नाही !

News Desk