HW News Marathi
राजकारण

मराठा आरक्षणावरून विरोधकांचे राजकारण | मुख्यमंत्री

मुंबई | “विरोधकांच्या मनात मराठा आरक्षणाबाबत काहीतरी काळंबेरं आहे. मराठा आरक्षणावरून विरोधक राजकारण करत आहेत”, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांकडून सभागृहात करण्यात आलेल्या घोषणाबाजीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. दरम्यान यावेळी “मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांचे देणे म्हणून तरी हा अहवाल सभागृहात मांडावा”, असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

“राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाबाबतची सर्व प्रक्रिया ही नियमांप्रमाणेच सुरु असून मराठा आरक्षणाचा एटीआर सभागृहात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यात ५२ टक्के नव्हे तर ५० टक्के आरक्षण आहे. तसेच एसईबीसीचे २ टक्के आरक्षण आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अहवाल मांडण्याबाबत आज चर्चा करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नलसह चार जवान शहीद, शिवसेनेची सरकारवर टीका

News Desk

उद्धव ठाकरे आज दुष्काळ दौऱ्यावर

News Desk

गांधीजींच्या हत्येचे समर्थन करण्याचा प्रश्चच येत नाही, अनंतकुमार हेगडेंचा घुमजाव

News Desk