HW News Marathi
राजकारण

उद्धव ठाकरे आज दुष्काळ दौऱ्यावर

जालना | महाराष्ट्र गेल्या अनेक महिन्यांपासून दुष्काळाने होरपळत आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांचे राज्यातील भीषण दुष्काळ समस्येकडे दुर्लक्ष झाले असले तरी आता लोकसभेच्या निकालानंतर मात्र सर्वच राजकीय पक्षांनी राज्याकडे आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (९ जून) जालना जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राळेगावच्या चारा छावणीला भेट दिली आहे. त्याचप्रमाणे, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचे वाटप देखील केले जाणार आहे. शिवसेना ही कायम दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत उभी राहील, असे आश्वासन देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रदेशाध्यक्षपदी सिंधिया यांना नियुक्त करा, अन्यथा राजीनामे देऊ !

News Desk

निवडणुकीच्या निकालापर्यंत वाट न पाहता दुष्काळग्रस्तांना दिलासा द्या !

News Desk

दिल्लीत पवार-राहुल गांधींची बैठक सुरु, राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन ?

News Desk