HW News Marathi
राजकारण

एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांकडून विरोध

मुंबई | मराठा समाजाला ‘एसईबीसी’ प्रवर्गातून आरक्षण देण्यास आता ओबीसी समाजाच्या काही संघटनांकडून विरोध होत आहे. ओबीसी फेडरेशनने या आरक्षणाबाबत न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार आहे. एसईबीसी स्वतंत्र प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा काल (रविवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

तामिळनाडूप्रमाणेच महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला असून या अहवालातील तिन्ही शिफारसी राज्य सरकारने स्वीकारल्या आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. हे आरक्षण सामाजिक- शैक्षणिक आणि मागासअंतर्गत आरक्षण देणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशात मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड, काँग्रेस नेत्यांकडून तक्रार

News Desk

आज द्रौपदी मुर्मूंच्या राष्ट्रपतीपदाच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब; देशाला मिळणार दुसरी महिला राष्ट्रपती

Aprna

पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता | आठवले

News Desk