HW News Marathi
राजकारण

लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करतात !

सिल्वासा | लोकशाहीचा गळा घोटणारे आज लोकशाही वाचवण्याची भाषा करतात, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोलकत्तामध्ये आज (१९ जानेवारी) तृणमूल काँग्रेससह २२ असे पक्ष एकत्र विरोधाकांची महाआघाडी पक्षांची जाहीर सभा आहे. या सर्व विरोधकांच्या एकजुटीवर मोदींनी जोरदार टीका केली आहे. मोदी सिल्वासा येथील मेडिकल कॉलेजच्या कार्यक्रमात बोलत होते.

विरोधकांची महाआघाडी ही माझ्याविरोधात नव्हे, तर देशवासीयांच्या विरोधात असल्याचे मोदींनी म्हटले आहे. पुढे मोदी असे देखील म्हणाले की, भाजपामुळे आज पश्चिम बंगालमध्ये सर्व भ्रष्ट राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू करताच काँग्रेसला भीती वाटू लागली आणि महाआघाडीचे प्रयत्न सुरू झाले. भारत जगातील सर्वोत्तम देश व्हावा, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही १३० कोटी लोकांसाठी काम करतो आहे. आमचे लक्ष कामावर आहे. कारण आम्ही कामदार आहोत, नामदार नाहीत, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

मी भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलली असल्यामुळे काही पक्ष नाराज झाले आहेत. त्यांना आता पूर्वीसारखी पैशांची लूट करता येत नाही. त्यामुळे आता त्यांनी एकत्र येत महाआघाडी केली आहे. ही आघाडी माझ्याविरोधात नव्हे, तर देशाच्या जननेविरोधात आहे. अद्याप आघाडी पूर्णपणे तयारही झालेली नाही. मात्र तरीही आपल्या वाट्याला काय येणार, यासाठी त्यांची सौदेबाजी सुरू आहे, असा घणाघात मोदींनी केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार ?

News Desk

मराठा आरक्षणावरून तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; मराठा क्रांती मोर्चाकडून संताप

Aprna

विधानसभेला युती निश्चित, लवकरच होणार अधिकृत घोषणा

Gauri Tilekar