HW News Marathi
राजकारण

महाविकास आघाडीकडे सर्वाधिक सरपंच आणि जागा! – अजित पवार

मुंबई | महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३२५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. भाजप आणि शिंदे गटाला ३०१३ सरपंच व इतर १३६१ आहेत. यामध्ये ७६१ हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे ४०१९ सरपंच निवडून आले आहेत.

 

या पध्दतीने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीत निवडून आल्या आहेत. त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले. दरम्यान या ग्रामपंचायतींचे निकाल लागायच्याअगोदरच भाजप – शिंदे गटाच्या जास्त जागा आल्या असे जाहीर केले ते धादांत खोटे होते.

ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडीच्या पाठी पाठबळ उभे केले आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान या आनंदाच्या क्षणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

swarit

“सत्यजीतने फार ताणून न धरता, काँग्रेसचा सहयोगी म्हणून काम करावे”, अजित पवारांची इच्छा

Aprna

जे राम मंदिराला विरोध करतील त्यांचे देशामध्ये फिरणे कठीण होईल | संजय राऊत

News Desk