HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : मुलासाठी संघर्ष उभा राहणे चुकीचे !

मुंबई | सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा प्रसार माध्यामासोमर आले आहे. मुलासाठी संघर्ष उभा राहणे चुकीचे असल्याचे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. “मी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी जो निर्णय घेईन तो तुम्हाला सांगेन”, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पुढे राधाकृष्ण विखे पाटील असे देखील म्हणाले की, सुजयसाठी मी प्रचार करणार नसून अहमदनगरमध्ये मी जाणार नसल्याचे देखील पाटील म्हणाले.

 

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 • माझ्या मुलासाठी संघर्ष होतोय हे चुकीचे आहे.
 •  काॅंग्रेस पक्षकडून काही जागा मागितल्या, जागांची आदला बदली बाबत चर्चा झाली
 •  अहमदनगरमध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झालेली आहे, म्हणून या जागेची मागणी काँग्रेसकडून केली केली
 • खुप चर्चा झाल्या,  योग्य समन्वय करण्यासाठी खूप प्रयत्न केले
 •  भाजपमध्ये जाण्याच्या बाबतीत सुजयने माझ्याबरोबर काही चर्चा केली नाही
 •  राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्या वडीलांच्या बाबतीत केलेले विधान हे अत्यंत चुकीचे, मला याबबत खूप दुःख झाले आहे. ते हयात नसताना केलेली टीका ही दुर्देवी
 •  शरद पवार यांच्या टिकेमुळे सुजयने हा निर्णय घेतला असावा.
 •  आघाडी धर्माला काही गालबोट लागेल असे मी वागलो नाही, शरद पवार यांनी दोन वेळाही विधाने केले आहे, मला याचे दुःख झालेले आहे
 • काॅंग्रेस पक्षश्रेष्टींची मी वेळ मागितली आहे, पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य आहे
 • बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे समजतात त्यांना मी उत्तर द्यायला बांधील नाही.
 • मी माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार करणार नाही
 • मला संशयाचे वातावरण तयार करायचे नाही.
 • शरद पवारांच्या मनात आमच्या कुटुंबीयाबाबत द्वेश आहे.

 

 

 

Related posts

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

अपर्णा गोतपागर

माधवन नायर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Gauri Tilekar

सभेच्या वेळी कोणी लाईट आणि केबल कनेक्शन तोडणाऱ्यांना तुडवा | राज ठाकरे

News Desk