HW News Marathi
राजकारण

…अन्यथा २६ जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन करू, लिंगायत समाजाचा इशारा

मुंबई | लिंगायत समाजाला आरक्षण द्या. जर ३१ डिसेंबरपर्यंत लिंगायत समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही तर येत्या २६ जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा लिंगायत समाजाने राज्य सरकारला दिला आहे. लिंगायत समितीकडून मंगळवारी पुण्यात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी समितीने आरक्षणाची मागणी केली. लिंगायत समाजाला संविधानिक आणि अल्पसंख्यांकाचा दर्जा देऊन ओबीसींमध्ये आरक्षण द्यावे, अशी मागणी या सभेत करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या स्वाक्षरीनंतर १ डिसेंबर २०१८ पासून मराठा आरक्षणाचा कायदा राज्यात लागू झाला आहे. दरम्यान, त्यानंतर धनगर आरक्षणाबाबत टीसचा अहवाल येऊन ३ महिने होऊनही सरकारने यावर अद्याप एटीआर आणला का नाही ?, असा प्रश्न उपस्थित करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर आरक्षणावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता लिंगायत समाजाकडून आरक्षणाची मागणी लावून धरली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही !

News Desk

गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट

News Desk

भाजपला संविधानाला हातही लावू देणार नाही

News Desk