HW News Marathi
राजकारण

आमच्या ‘या’ काही उत्साही नेत्यांना दुसरे काम देण्याची गरज !

नवी दिल्ली | “आमच्याकडे असे बरेच नेते आहेत ज्यांना माध्यमांशी बोलायला प्रचंड आवडते. त्यामुळे आम्हाला आता आमच्या या काही उत्साही नेत्यांना दुसरे काहीतरी काम देण्याची गरज आहे”, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. राफेल विमान खरेदी करार प्रकरणी संपूर्ण देशापुढे आपली बाजू मांडण्यासाठी भाजपकडून देशभरात तब्बल ७० पत्रकार परिषदा घेण्यात येणार आहेत. याबाबत नितीन गडकरी बोलत होते.

नितीन गडकरी यांनी यावेळी एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील दृश्याचा दाखला देत आपले म्हणणे मांडले आहे. ‘बाँबे टू गोवा’ या हिंदी चित्रपटातील एका दृश्यात आपल्या मुलांना खाण्यापासून अडविण्यासाठी आई-वडील त्यांच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबतात. आमच्या पक्षातील काही लोकांना देखील अशाच कापडाच्या गोळ्याची आवश्यकता असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटले.

नितीन गडकरी यांनी अनेकदा आपल्या पक्षातील नेत्यांच्या तसेच कार्यकर्त्यांचा खटकणाऱ्या गोष्टींवर भाष्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरींनी पक्षातील कार्यकर्त्यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली होती. “भाजप कार्यकर्त्यांचे वर्तन हे खरोखरीच अटलजींना अपेक्षित वर्तन आणि विचारांसारखे आहे का ?”, असा सवाल नितीन गडकरी यांनी केला होता. त्याचप्रमाणे, भाजपचे कार्यकर्ते, नेते हे ‘माझ्या गळ्यात लहान हार का घातला ह्यापासून मला फक्त चहाच का दिला, बिस्कीट का नाही ?’ अशा कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून वाद घालत असतात असेही नितीन गडकरी यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खरगे विरूद्ध थरूर; उद्या होणार मतदान

Darrell Miranda

मराठा आरक्षणावर पुढची सुनावणी २७ जुलैला,सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष!

News Desk

अर्थसंकल्प सादर करताना काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांकडून झाली मोठी चूक

Aprna
व्हिडीओ

श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? शिवसेनेचा सवाल

Atul Chavan

राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या! असा टोला शिवसेनेने भाजपला लावला आहे. श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? असा प्रश्न आज सामना मधून पुन्हा उपस्थित करण्यात आला आहे.

Related posts

Rahul Bondre Congress | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपऐवजी शिवसेनेत जाणार ?

Arati More

“Amol Mitkari तुम्ही राजकारणात नको, सिनेमात जा!”; फडणवीसांवरून BJP-NCP मध्ये जुंपली

News Desk

Jayant Patil NCP | राष्ट्रवादी या विधानसभेत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल !

Gauri Tilekar