HW News Marathi
राजकारण

आरएसएस आणि भाजपची विचारसरणीही हिटलरच्या नाझीवादाशी प्रेरित !

मुझफ्फराबाद | भारत सरकारने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले. यानंतर पाकिस्तानने जळफळाट होत असल्याचे चित्र आज (१४ ऑगस्ट) पाकिस्तानच्या स्वातंत्र दिन भाषणादरम्यान त्यांचे सैन्य भारतासोबत युद्धाला तायर असल्याचे सांगत धमकी वजा इशारा दिला आहे. खान यांनी पुढे असे देखील म्हटले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने कलम ३७० रद्द केल्यावरून भाजप आणि आरएसएसवर टीका केली.

खाने आरएसएसच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित असल्याचे सांगत नाझी विचारसरणीमुळे आज काश्मीरचा प्रश्न चिघळला असल्याचे उदाहरण दिले. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिम उद्ध्वस्त होतील आणि त्यानंतर पाकिस्तानला टार्गेट करण्यात येईल. हा सर्व प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची पुनरावृत्ती आहे. काश्मीरचा नकाशा बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जातोय. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते, त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही आज जग गप्प असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.

मोदी जो खेळ खेळत आहे, तो पुढे जाऊन भारताला महागात पडणार आहे. काश्मिरी लोकांसोबत मोदींनी विश्वासघात केला आहे. नेहरूंनी काश्मिरी लोकांना त्यांच्या अधिकारांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नसल्याचे आश्वासन दिले होते. परंतु मोदी सरकार या उलट कृत्य करत सुटले आहे. मोदी सरकारला मानवी मूल्य, आंतरराष्ट्रीत पातळीवरचा विरोध, शिमला करार याची काहीही पर्वा नाही. यांची विचारधारा नाझींसारखी झाली आहे. आरएसएसची विचारधाराही नाझींच्या विचारधारेच्या मार्गानं जात असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांगली जिल्हयातील ग्रामीण भागातील एका लहान शेतकरी कुटुंबात डॉ. पतंगरावांचा जन्म

News Desk

काँग्रेसला आघाडीसाठी विचारुन थकलो पण काँग्रेस दादच देत नाही !

News Desk

भाजपकडून प्रचारासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

News Desk