HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

पंकजा मुंडे यांनी गुणरत्न सदावर्तेंची केली कानउघडणी

बीड :- अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उस्मानाबाद येथे स्वतंत्र मराठवाडा आणि विदर्भ राज्याची मागणी केली आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी त्यांनी शुक्रवारी उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदही घेतली. याचा संभाजी ब्रिगेड व विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सदावर्तेंची कानउघडणी केली आहे. त्यांचे संविधानिक आणि राजकीय योगदान काय आहे, असा प्रश्न विचारत पंकजा मुंडे या सदावरतेवर चांगल्याच संतापलेल्या पाहायला मिळाल्या.

गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली होती. यावरच आज (शनिवार, 26 नोव्हेंबर) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. वेगळ्या मराठवाड्याची मागणी करणारे नेमके कोण आहेत? त्यांना संविधानिक आणि राजकीय योगदान आहे का? असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला. हे विषय मांडणारे नेमके कोण आहेत. त्यांचा काही यावर अभ्यास आहे का? असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांचे पंकजा मुंडेंनी कान टोचले आहेत. पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दवऱ्यावर आल्या असताना माध्यमांशी त्या बोलताना सदावर्ते यांची चांगलीच खबर घेतली.

दरम्यान शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. यावर मात्र पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले असल्याचे दिसून आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा कोरेगाव प्रकरणी एकबोटेंना जामीन मंजूर

News Desk

मोदी – फडणवीस हत्येचा कट ही केवळ अफवा

News Desk

कराडमध्ये राष्ट्रवादीचा विजय तर आणखी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

News Desk