HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडेंचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

बीड | मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज (२७ जानेवारी) औरंगाबादमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. हे उपोषण सत्ताधारांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचे यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपचे अनेक दिग्गज नेते आज दिवसभरात या उपोषणासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे थोड्याच वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील उपोषणस्थळी आपली उपस्थिती दर्शविली आहे. पंकजा मुंडेंच्या या उपोषणाला आपले समर्थन दर्शविण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

देवेंद्र फडणवीस असे म्हणाले कि, “मी सर्वप्रथम पंकजा मुंडेंचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. गेल्या ५ वर्षात मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आमच्या सरकारने जे प्रयत्न केले ते पुढे नेण्याचे काम पंकजा मुंडे करीत आहेत. मला विश्वास आहे कि आज जरी हे उपोषण लाक्षणिक होत असले तरीही आपल्या सरकारने मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याकरिता ज्या योजना हाती घेतल्या होत्या त्या योजना जर आताच्या सरकारने पुढे नेल्या नाहीत तर हे केवळ उपोषणापुरते मर्यादित राहणार नाही आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरू. मराठवाड्याचे पाणी विद्यमान सरकार बंद करेल, याची आम्हाला भीती आहे”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र भाजपमधील अंतर्गत चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याप्रती तीव्र नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह पंकजा मुंडे देखील होत्या. मात्र, आज पंकजा मुंडेंच्या या उपोषणाला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविल्याने आता त्यांच्यातील हा वाद काहीसा निवळल्याची शक्यता आहे. यावेळी उपोषणस्थळी देवेंद्र फडणवीस,रावसाहेब दानवे यांच्यासह विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर, रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी देखील उपस्थिती दर्शविली आहे. दुपारी साडेतीन वाजता पंकजा मुंडे येथील उपस्थितांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts

#RafaleDeal : कॅगच्या अहवालाबाबत राहुल गांधींची पत्रकार परिषद

Gauri Tilekar

मोदी-शहा पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी उद्या पुण्यात येणार

News Desk

नितीन गडकरींचा पराभव निश्चित, काँग्रेसचा दावा

News Desk