मुंबई | पार्थ पवार आणि रोहित पवार आगामी लोकसभा निवडणुका लढविणार नसल्याचे अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय झालेल्या पार्थ आणि रोहित पवार आगामी निवडणुका लढविणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. पार्थ पवार यांनी काल (१८ फेब्रुवारी) पक्षाने संधी दिली तर मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचे देखील म्हटले होते. मात्र शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
केंद्रात गेल्यास राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्यास मोठी संधी उपलब्ध होईल. त्यामुळे राज्यापेक्षा केंद्राकडे जास्त लक्ष असल्याचे पार्थ पवार यांनी म्हटले होते. आगामी निवडणुकांमध्ये जर पक्षाकडून मावळ मतदारसंघामधून दुसऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर २०२४ च्या निवडणुकीपर्यंत थांबण्याची माझी तयारी असल्याचे देखील पार्थ पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.