नवी दिल्ली | लोकसाभा निवडणुकाची घोषणा येत्या दोन दिवसात मुख्य निवडणूक आयोक करणार आहेत. त्यापूर्वी देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. गुजरातमधील पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हार्दिक मंगळवारी (१२ मार्च) काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची असल्याची माहिती ‘पीटीआय’ या वृत्त संस्थेने दिली आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीवेळी हा प्रवेश होण्याची चिन्हे आहेत. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून हार्दिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी हार्दिक यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन केले होते. यानंतर हार्दिक प्रकाशाच्या झोतात आले होते. त्यांची ही लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा मानस असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती.जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.