HW News Marathi
राजकारण

राज्यपालांविरोधात आझाद मैदानावर करणार आंदोलन; उदयनराजेंची घोषणा

मुंबई | “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत”, अशी घोषणा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निर्धार शिवसन्मान मेळाव्यात केले आहे. उदयनराजेंनी आज (3 डिसेंबर) राजगडावर आयोजित केलेल्या निर्धार शिवसन्मान मेळाव्यात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानावरून हल्लाबोल केला आहे.

उदयनराजे म्हणाले, “राज्यपालांवरून पांघरुन घालणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. यासंदर्भात कोणीही ठामपणे व्यक्त होत नाही. पुढचा मोर्चा हा आझाद मैदानावर असेल. या मोर्चाची तारीख लवकरच जाहीर करू, असे म्हणत त्यांनी राजपालांवरिोधात रणशिंग फुकले. उदयनराजे पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले असून महाराजांनी सर्व जाती, धर्माचा सन्मान करण्याची शिकवण दिली. महाराजांचा अपमान सहन करणार नाही.”

“राज्यात राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. परंतु, शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. प्रोटोकॉल बोलून राज्यपालांना पाठिशी घालतात. हे चूक ही चूक आहे”, असे म्हणत उदयनराजेंनी राज्यापालांना पाठिशी घालणाऱ्या त्यांच्या पक्षातील सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले.

 

 

 

 

Related posts

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर पंकजा मुंडेंचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

News Desk

इम्रान खानच्या गुगलीवर सुषमा स्वराज यांची बॅटिंग

News Desk

कोण आहेत राष्ट्रवादीचे ३१ प्रवक्ते ?  

News Desk