मुंबई | भाजपा ने सुरु केलेल्या संपर्क फॉर समर्थन या अभियानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला रविवारी मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही,असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना लगावलाय. मुख्यमंत्र्यानी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत पवारांना लक्ष केले आहे.
मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही!
पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य बाहेर येईलच— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी असुन पंतप्रधान हे पक्षाचे नाही,तर देशाचे नेते असतात व पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे,द्वेषाचे नाही अस ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
It is very unfortunate that Sharad Pawar ji is raising doubts about the communication ceased by the police which revels the plot to assassin Hon PM @narendramodi ji.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2018
रविवारी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना पालघरमध्ये विजय झाल्याचा भाजपचा दावा किती पोकळ आहे हे सांगत पवारांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. नोटाबंदी, सरकारची चार वर्षे, ईव्हीएम बिघाड, महाराष्ट्र सदन अशा अनेक मुद्द्यांवरून पवारांनी सरकारला लक्ष्य केले.
It is very unfortunate that Sharad Pawar ji is raising doubts about the communication ceased by the police which revels the plot to assassin Hon PM @narendramodi ji.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 10, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.