HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपच्या संकल्प पत्रात छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी ६० वर्षांनंतर पेन्शन

नवी दिल्ली | काँग्रेसच्या त्यांच्या जाहीरनाम्यात गरिबांना आर्थिक करण्यासाठी न्याय योजनाची घोषणा केली होती. या योजनेला तोंड देण्यासाठी भाजपने छोट्या व्यापारी आणि  शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन देण्याची महत्वाची घोषणा केली आहे.  शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान क्रेडीट कार्डवर मिळणाऱ्या १ लाख रुपये कर्जावर ५ वर्षापर्यंत व्याज आकारला जाणार नाही.  भाजपने आज (८ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे संकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आल्या आहे.

तसेच राम मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील. लवकरात लवकर सौहर्द्रपूर्ण वातावरणात मंदिर उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही आश्वासन दिले आहे. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित ३५ ए हटविण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असेही नमूद केले आहे. भाजपच्या संकल्प पत्र प्रसिद्धच्या वेळीस भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी संकल्प पत्रातील मुद्दे जाहीर केले.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आमचे धोरण पूर्वी देखील झिरो टॉलरेंस होते आणि पुढे अशीच राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणताही प्रकारचा समझोता केला जाणार नसल्याचे सांगितले. तसेच तिहेरी तलाक विरोधात कायदा करून मुस्लिम महिलांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा संकल्प भाजपने केला आहे.

काँग्रेसने देखील २ एप्रिल रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव ‘हम निभाएंगे’ असे आहे. “पंतप्रधान मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. परंतु, आम्ही जी आश्वासने देऊ ती पूर्ण करणार आहे”, असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले होते. त्यावेळी भाजपकडून देखील काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका करण्यात आली होती. “जर काँग्रेस केंद्रात सत्तेत आले तर देशद्रोहाचे कलम रद्द करू”, असे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे. “काँग्रेसला भारताचा तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल सहानुभूती आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.

 

 

Related posts

‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल

News Desk

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk

…तर तो दिवस ठरला, प्रश्न ठाकरेंचे उत्तर पवारांचे

अपर्णा गोतपागर