HW News Marathi
राजकारण

ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोल स्वस्त

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त आज मनसेतर्फे मुंबईतल्या 36 पेट्रोल पंपावर पेट्रोल 4 रुपये स्वस्त दरात देण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढ्या दरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असुन त्याचाच भाग म्हणून राज ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी स्वस्त पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.मनसेने फक्त टीकाच केली नाही तर एक दिवस का असेना, पेट्रोल दरात मोठी कपात करत 36 ठिकाणी पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त देण्यात येणार आहे. मनसे सरकारमध्ये नसूनही 4 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत असेल, तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना मोदींना हे कसे शक्य नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याकडे निव्वळ विनोद म्हणून पाहते”- प्रीतम मुंडे

News Desk

२०१९च्या निवडणुकीत ‘कर्नाटकी कशिद्या’ची छाप दिसेल काय?

News Desk

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा ठराव संमत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

Aprna