मुंबई | देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांच्या महांसग्रामाला सुरुवात झाली आहे. देशभरात ११ एप्रिल २०१९ ते १९ मे २०१९ दरम्यान लोकसभा निवडणुका सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचे आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच गुरुवारी २३ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकलभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटकरून जनतेकडे पाठिंबा मागितला आहे. मोदी यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
Guided by ‘Sabka Saath, Sabka Vikas’, NDA seeks your blessings again.
We spent the last five years fulfilling basic necessities that were left unfulfilled for 70 long years. Now, time has come to build on that and create a strong, prosperous & secure India. #PhirEkBaarModiSarkar— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2019
मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “सबका साथ, सबका विकास या मुल्यांनुसार काम करणाऱ्या एनडीएला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. गेल्या ७० वर्षांपासून देशवासियांचा ज्या गरचा पूर्ण केल्या नव्हत्या. त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या पाच मूलभूत गरजांना प्रध्यान देत विकास कामे केली आहे. या देशाला शक्तीशाली, समृद्ध आणि सुरक्षित करण्याची गरज आहे.” असे ट्वीट मोदींनी करत फिर एक बार मोदी सरकार (#PhirEkBaarModiSarkar)असा हॅशटॅग वापरला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.