मुंबई | “फोन टॅपिंगचे आरोप बिनबुडाचे आहेत. फोन टॅपिंग ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने कोणत्याही यंत्रणेमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी”, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या नेत्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महाविकासआघाडीकडून भाजप सरकारच्या काळात काही नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्य काही नेत्यांचे फोन टॅप केल्याचा गंभीर आरोप आता महाविकासआघाडीच्या सरकारकडून करण्यात येत आहे.
Phone-tapping of opposition leaders not Maharashtra's tradition, MVA government free to probe it: Fadnavis
Read @ANI Story | https://t.co/P8KEVnsMOZ pic.twitter.com/NFdc1wU5s7
— ANI Digital (@ani_digital) January 24, 2020
देवेंद्र फडणवीस यांनी या ‘फोन टॅपिंग’च्या आरोपांप्रकरणी आता स्पष्टीकरण दिले आहे. “राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठावूक आहे. तथापि, राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठावूक आहे. शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी”, असे थेट आव्हान फडणवीसांनी दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.