HW News Marathi
राजकारण

पित्रोदा यांना असे वक्तव्य करताना लाज वाटायला हवी होती !

नवी दिल्ली | काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी १९८४ साली झालेल्या च्या शीख विरोधी दंगलीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता पुन्हा एकदा सॅम पित्रोदा यांना कठोर शब्दात सुनावले आहे. “सॅम पित्रोदा यांना असे वक्तव्य करताना लाज वाटायला हवी होती”, असे म्हणत राहुल गांधी यांनी सॅम पित्रोदा यांना त्यांच्या या वक्तव्याबाबत देशाची माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. पंजाबमधील फतेहगड साहीब मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अमर सिंह यांच्या प्रचार सभेदरम्यान राहुल गांधी बोलत होते.

“मला असे वाटते कि सॅम पित्रोदा यांनी जे विधान केले आहे ते पक्षाच्या भूमिकेशी पूर्णपणे फारकत घेणारे आहे. म्हणूनच यासाठी त्यांनी माफी मागायला हवी. १९८४ सालची दंगल ही एक अत्यंत मोठी दुर्घटना आहे. या दुर्घटनेमुळे लोकांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला आहे. याप्रकरणातील पीडितांना न्याय मिळालाच पाहिजे. जे लोक यासाठी जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे”, असे यापूर्वीही राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते.

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा ?

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिल्लीतील रामलीला मैदानात आपल्या प्रचारसभेत शीख दंगलीवरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. “काँग्रेसला आपल्या पूर्वजांच्या नावावर मते हवी आहेत. परंतु, त्यांची कारस्थाने समोर आणली कि त्यांना त्रास होतो. १९८४ च्या शीख दंगलीचा हिशेब कोण देणार ?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता.

सॅम पित्रोदा या पार्श्वभूमीवर म्हणाले होते कि, “आता १९८४ चा काय संबंध ? तुम्ही (मोदी) ५ वर्षात काय केले, त्यावर बोला. १९८४ मध्ये जे झाले ते झाले. तुम्ही काय केले ? रोजगार निर्मितीसाठी, २०० स्मार्ट सिटीजसाठी तुम्हाला मत देण्यात आले होते. तुम्ही ते देखील नाही केले.” त्यावर शुक्रवारी (१० मे) सॅम पित्रोदा यांनी स्पष्टीकरण दिले होते. “शीख बंधू-भगिनींचे दुःख मी समजू शकतो. भाजपकडून माझ्या तीन शब्दांची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे”, असे सॅम पित्रोदा यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टॉलिवूडने केले मतदान

News Desk

गॅस दरवाढीवरुन ‘मविआ’चे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी

Aprna

नाणार प्रकल्पासाठी काहीच आठवड्यात जमीन मिळणार, यूएईच्या राजदूतांची माहिती

News Desk