HW Marathi
राजकारण

विरोधी पक्ष ‘मोदी हटाव’चे नारे देण्यात तर मी लोकहिताचे निर्णय घेण्यात व्यस्त !

नवी दिल्ली | “एकीकडे देशातील विरोधी पक्ष ‘मोदी हटाव’चे नारे देत आहेत तर दुसरीकडे मी मात्र लोकांच्याच आशीर्वादाने लोकहिताचे निर्णय घेत आहे. त्यांनी मोदीवर स्ट्राईक करण्याचे ध्येय ठेवले आहे तर मोदी मात्र दहशतवादाच्या समस्येवर स्ट्राईक करण्याच्या विचारात आहे”, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी (५ मार्च) गुजरातच्या गांधीनगर येथे असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत ६० वर्षावरील असंघटीत कामगारांना ३ हजार रूपये मासिक निवृत्ती वेतन मिळणार आहे. देशातील १० करोड श्रमिक कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. “गेली ५५ वर्षे गरिबांच्या नावे मते मिळवणाऱ्यांनी सत्तेचा उपभोग घेतला. मात्र देशातील असंघटीत कामगारांसाठी कोणत्याही योजना लागू करण्याची त्यांची इच्छा झाली नाही. आपल्या देशात गरिबी ही सर्वात मोठी समस्या आहे. मात्र, काही लोकांसाठी गरीब लोक हे फक्त फोटो काढण्यापुरतेच आहेत. त्यांना गरिबांच्या दुःखाशी काहीही देणेघेणे नाही. अशा लोकांची मानसिक अवस्था गरीब आहे”, अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता केली आहे.

Related posts

सरकार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट रचत आहे का ?

News Desk

देश सध्या अवघड परिस्थितीतून जात आहे | प्रणव मुखर्जी

News Desk

#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे !

News Desk