HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींवरील जीवनपट म्हणजे निवडणुकांमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न !

मुंबई । “पंतप्रधान मोदींचा हा जीवनपट म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे”, असे म्हणत ‘पीएम नरेंद्र मोदी’ या पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना आचारसंहितेच्या नियमांचे भंग करत हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचा हा जीवनपट म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. हा चित्रपट प्रदर्शित होणे म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत. त्यानंतरही जर हा चित्रपट प्रदर्शित झाला किंवा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न झाला तर पुढे उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी ही या चित्रपटाचे निर्माते, वितरक, प्रशासन आणि चित्रपटगृह मालकांची राहील”, असे राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले, युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

News Desk

मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास गुन्हा दाखल करणार !

News Desk

आत्तापर्यंत गेहलोत यांनी काय केले ? पायलट यांच्या समर्थकांचा सवाल

News Desk