नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचा भाजपकडे एक हाती सत्ता आल्यानंतर नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे काल (२४ मे) पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना १६वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारसही केली आहे.
PM Narendra Modi met the President today and tendered his resignation along with the Council of Ministers. The President has accepted the resignation and has requested Narendra Modi and the Council of Ministers to continue till the new Government assumes office. pic.twitter.com/dX4TltRA5S
— ANI (@ANI) May 24, 2019
राष्ट्रपतींनी नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आणि कार्यभार सांभाळेपर्यंत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने काम सुरु ठेवावे, असे राष्टपतींनी म्हटले आहे. त्याआधी पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. बैठकीत १६ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅबिनेटची शिफारस राष्ट्रपतींना पाठवण्यात आली, त्या आधारावर १६ वी लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याची घोषणा केली जाईल. ३ जूनपर्यंत सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला आहे. तर एनडीएने एकूण 352 जागा जिंकल्या आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान असणार आहे. मात्र नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.