HW News Marathi
राजकारण

#MeToo प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासाव्यात !  

मुंबई | #MeToo प्रकरणात पोलिसांनी दोन्ही बाजू तपासून पाहायला हव्यात असे मत युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ते डोंबवलीमध्ये नवरात्रोत्सवा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

#MeToo आणि एसएनडीटीमधील विद्यार्थिनींनी महिला वॉर्डनवर केलेल्या आरोपांसंदर्भात त्यांना विचारले असता जिथे महिलांसोबत लैंगिक गैरवर्तनाचे प्रकार होतात, तिथे तातडीने कारवाई झालीच पाहिजे, असे अादित्य ठाकरे यांनी सांगितले. अशा प्राध्यापकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सोशल मीडिया तसेच प्रसिद्धी माध्यमाद्वारे अनेक महिला आवाज उठवत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या #MeToo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्री तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला आवाज उठवत आहेत. त्याच बरोबर अनेक वर्ष जुन्या घटना यामुळे सर्वांसमोर येत आहेत. तसेच या माध्यमातून अनेक प्रतिष्ठित लोकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या…कोणकोणत्या सिनेकलाकारांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

News Desk

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड

Arati More

पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर ठेवा !

Gauri Tilekar
व्हिडीओ

नवशक्ति : मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक संगीता वंजारे

News Desk

संगीता वंजारे यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबातला. आई-वडील आणि पाच बहिणी. वडील बीएमसीत कामाला होते. सर्वकाही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच काळाने घाला घातला. वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबावर हलाखीचे दिवस आले. परंतु, अशा परिस्थितीतही आईसह या पाच हि बहिणी न डगमगता परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.

Related posts

Masood Azhar | असा ठरतो “आंतरराष्ट्रीय दहशतवादी”

Atul Chavan

vinod tawde विनोद तावडे राजीनामा द्या !

News Desk

गोविंदबागेतल्या पाडव्याला Ajit Pawar यांची दांडी!; Sharad Pawar यांनी सांगितलं खरं कारण

News Desk