HW News Marathi
राजकारण

बीडमध्ये राजकीय भूकंप !

मुंबई | राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत बंधू रामेश्वर मुंडे यांनी मंगळवारी (१६ एप्रिल) आपले बंधू विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा एक दिवसावर येऊन ठेपलेला असताना त्यांनी बहिणीची साथ सोडत आपल्या भावावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आता बीड लोकसभा मतदारसंघात बहीण- भावाच्या लढतीचे स्वरूप आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बीड लोकसभा निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी धनंजय मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर आपल्या लहान बहिणीला विजयी करण्यासाठी पंकजा मुंडे जीवाचे रान करत आहेत. पंकजा मुंडे यांचे २ चुलत भाऊ धनंजय मुंडे व दुसरा एक भाऊ यापूर्वीच राष्ट्रवादीत आहेत. लोकसभा निवडणूक एक दिवसावर येऊन ठेपली असताना रामेश्वर मुंडे या तिसऱ्या भावाने देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंगळवारी प्रवेश केला .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीची खरेदी करताय, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या !

News Desk

‘सपा’ची पहिली यादी जाहीर, मुलायम सिंग ‘मैनपुरी’ मतदारसंघातून लढणार

News Desk

उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप जाहीर सभेत सादर

News Desk