HW News Marathi
राजकारण

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

सातारा | छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातले राजकीय वितुष्ट जगजाहीर आहे. त्यातच हे दोघे एकाच व्यासपीठावर आले तर लोकांना आश्चर्याचा धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. परंतु चक्क एकाच व्यासपीठावर या दोघांना पाहून अनेकजण आवाक झाले. निमित्त होते सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा बक्षीस समारंभाचे. या बक्षिस समारंभाला उदयनरोजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही उपस्थित राहिले होते.

अनेक दिवसांपासून या दोन्ही राजांमध्ये राजकारणावरुन जोरदार टीका सुरू आहे, परंतु या कार्यक्रमात मात्र पहिल्यांदा शिवेंद्रराजे भोसले आले त्यानंतर पाच मिनीटांनी उदयनराजे भोसले आले, एकाच व्यासपिठावर हे दोघे आल्यामुळे उपस्थितांपैकी अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, दोघे एकाच व्यासपीठावर असल्यामुळे कदाचित एकमेकांशी संवाद साधतील असे वाटणा-या अनेकांचा यावेळी अपेक्षा भंग झाला असेच म्हणावे लागेल. या कार्यक्रमात दोघेही शेजारी बसले होते मात्र एकमेकांशी काहीच बोलले नाहीत.

Related posts

बिहारच्या छपरा येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन फोडल्याने गोंधळ

News Desk

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार | उद्धव ठाकरे

News Desk

भविष्यात काहीही होऊ शकते !

News Desk