मुंबई | केंद्राकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. यावेळी तीन वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतांचा सन्मान करण्याचे केंद्र सरकारने ठरविल्याचे दिसून आले आहे. यंदा तरी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ दिले जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण तसे झाले नाही.
एकीकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हे पुरस्कार जाहीर झाल्यावर सर्व पुरस्कार मिळलेल्या व्यक्तींचे अभिनंदन केले आहे. यावेळी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना विनोद तावडे यांनी सरकारचे अभिनंदन केले आहे. राजकारणा पलीकडे जाऊन हे पुरस्कार देण्यात आल्याचे यावेळी विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
भारतरत्न नककी कुणाला?
आज नानाजी देशमुख,भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले.
वीर सावरकरांच्या नशीबी पुन्हा काळे पाणी.
शेम शेम— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2019
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2019
तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मोदी सरकरवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार न दिल्याने खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आपली ही नाराजी संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. भारतरत्न पुरस्काराचा फोटो ट्विटरवर शेएर करत विनायका प्राण तळमळला असे लिहून राऊत यांनी सरकारला लक्ष्य केलय. “भारतरत्न नक्की कुणाला ? आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणि प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. मात्र, वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी, शेम शेम”, असे लिहून आपला संजय राऊत यांनी रोष व्यक्त केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.