HW News Marathi
राजकारण

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची नियुक्ती होण्याची शक्यता ?

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (१७ मार्च) निधन झाले. गेले अनेक महिने पर्रीकर हे कर्करोगासारख्या आजाराला झुंज देत होते. दरम्यान, पर्रीकर यांच्या निधनानंतर आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून गोव्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. गोवा विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत हे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

गोवा काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर मध्यरात्रीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले. एकीकडे काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे भाजपकडून गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबतच्या निर्णयासाठी एका मागोमाग एक बैठका घेतल्या गेल्या. या बैठकीत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी ठाकरेंनी टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेऊन केली आरती; ठाकरे गट- शिंदे गटाचा सामना टळला

Aprna

अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

News Desk

भाजपच्या मेळाव्यात मंत्री गिरिश महाजनांना धक्काबुक्की

News Desk