HW Marathi
राजकारण

प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पणजी | गोवा विधानसभेचे सभापती आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी सोमवारी (१८ मार्च) रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यानंतर अवघ्या काही वेळातच प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होईल अशी माहिती मिळत होती. आता अखेर प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्याचप्रमाणे मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे दोन्ही आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार झाला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गोव्यातील एका हॉटेलमध्ये सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेनंतर प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी तर सुदिन ढवळीकर आणि  विजय सरदेसाई या दोघांची गोव्याच्या उपमुख्यमंत्री नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनोहर पर्रिकर यांनी रविवारी (१७ मार्च) दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. पर्रिकर यांच्या निधनांनंतर गोव्याचे नव्या मुख्यमंत्र्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु होती. दरम्यान, काँग्रेसने देखील राज्यपालांकडे गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा केला होता. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना पत्र सादर केले होते.

गोवा विधानसभेतील पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे :

  • एकूण संख्याबळ – ३६
  • भाजप- १२
  • महाराष्ट्र गोमंतक पार्टी – ३
  • गोवा फॉरवर्ड पार्टी – ३
  • अपक्ष – ३ 
  • काँग्रेस – १४
  • एनसीपी – १

Related posts

काँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन

News Desk

Budget2019 : निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार

News Desk

नरसिंहा राव यांच्यानंतर मनमोहन सिंह हे देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान !

News Desk