HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

प्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये

मुंबई | काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण छेडा यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत स्वगृही परतले आहे. प्रवीण छेडा यांच्यासोबत उत्तर महाराराष्ट्रातील दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांची सुन डॉ. भारती पवार यांनी देखील भाजपमध्ये पुन्हा परतले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थिती या दोघांनी प्रवेश केला आहे.

भाजपने काल (२१ मार्च) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत ईशान्य मुंबईतील उमेदवारांचे नाव अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपचे इच्छुक उमेदवार किरीट सोमय्या हे येथील विद्यमान खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने विरोध केल्याने भाजपने या ठिकाणचा उमेदवाराची घोषित केली नव्हती.

किरीट सोमय्या यांच्याऐवजी प्रवीण छेडा यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. परंतु प्रवीण छेडा हे आधी भाजपमध्येच होते. परंतु, प्रकाश मेहता यांच्यासोबतच्या मतभेदामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

 

Related posts

कितीही प्रयत्न केलात तरी हे भ्रष्टाचाराचे भूत तुमचा पाठलाग सोडणार नाही !

News Desk

अमेरिकेप्रमाणे भारताने देखील एअर स्ट्राईकचे पुरावे जगापुढे ठेवावेत !

News Desk

पश्चिम बंगाल सरकारने हेलिकॉप्टरला परवानगी नाकारल्याने राहुल गांधींची सभा रद्द

News Desk