HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शिवसेनेवर टीका करणे किरीट सोमय्या यांना महागात पडणार का ?

मुंबई | भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतून पूनम महाजन आणि गोपाल शेट्टी यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु ईशान्य मुंबईतून भाजपचे इच्छूक आणि सध्याचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाकडून सस्पेंस ठेवण्यात आला आहे.

किरीट सोमय्या यांना पुन्हा उमेदवारी न देण्याबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीसंदर्भात झालेल्या चर्चेत शिवसेनेने तीन अटी ठेवल्या होत्या. यापैकी एक म्हणजे किरीट सोमय्या यांची उमेदवारी रद्द करवी, जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही सोमय्या यांचा प्रचार करणार नाही, असे शिवसेनेने म्हटले होते. यावर भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालिका निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी नेमके काय म्हणाले

मुंबई महापालिकेत माफिया राज असून वांद्र्यातील माफिया याला जबाबदार आहे. भाजप ते उलथवून लावेल”, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले होते. किरीट सोमय्या यांनी पालिका निवडणुकीत शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. यामुळे शिवसैनिकांनी लोकसभा निवडणुकीत सोमय्या यांचा प्रचार आम्ही करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यामुळे भाजपकडून देखील ईशान्य मुंबई मतदार संघातील उमेदवारी निश्चित करण्यात आली नसून भाजप  या मतदार संघात नवीन उमेवरांचा शोधा गेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related posts

पुढच्या ४८ तासांत युतीबाबत निर्णय घ्या अन्यथा… !

News Desk

अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही !

Shweta Khamkar

आम्ही जाती-पातीचे राजकारण करत नाही | मोदी

News Desk