नवी दिल्ली | एकेकाळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असलेले प्रविण तोगडिया राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. भाजपावर निवडणुकीत दबाव निर्माण करण्यासाठी तोगडीया नवीन पक्षाची स्थापना करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विवादानंतर तोगडिया व्हीएचपी मधून बाहेर पडले होते. नंतर त्यांनी हिंदू संघटना ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’चे स्थापन केली.
इस प्रस्ताव में भाजपा ने कहा था की अयोध्या में राम जन्मभूमि पर भव्य राममंदिर बनाने के लिए परस्पर संवाद से अथवा सुयोग्य क़ानून बनाने (enabling legislation) का प्रयास करेंगे।
— RSS (@RSSorg) January 1, 2019
प्रवीण तोगडीयांनी बुधवारी सांगितले की, ते एका महिन्यात एक राजकीय पक्ष तयार करतील आणि आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागांवर उमेदवार निवडतील. पक्षाच्या स्थापनेची तयारी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच ते पक्षाचे नाव जाहीर करणार असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणालेत.
अयोध्येमध्ये शिवसेनेचे अयोध्यावासी व राम भक्तांनी जे स्वागत केले व प्रेम दिले त्याबद्दल सर्वांचे आभार. राम मंदिर लवकरात लवकर निर्माण व्हावे अशी समस्त हिंदू बांधवांची इच्छा आहे आणि तीच इच्छा घेऊन अयोध्येचा दौरा पूर्ण झाला.
जय श्री राम!! pic.twitter.com/DsyzeLe38f— ShivSena – शिवसेना (@ShivSena) November 25, 2018
एक दिवसीय जोधपूर दौ-यावर असलेले तोगडीया म्हणाले भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार प्रत्येक वेळी अपयशी ठरले आहे. आता देशातील लोकांना पर्याय हवा आहे. त्यांनी सांगितले की मोदी सरकारने अयोध्यामधील राम मंदिराच्या बांधकामाबाबत काहीच केलेले नाही, जम्मू कश्मीरमध्ये हिंदूंना परत आणणे, युवकांच्या रोजगाराचे आणि शेतक-यांचे प्रश्न त्यांनी अद्याप सोडवलेले नाहीत.
तोगडिया यांनी सांगितले की, आपला पक्ष स्वामीनाथन अहवालाच्या शिफारशी अंमलात आणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून शक्य तितक्या लवकर राम मंदिर बनविण्याच्या अजेंडावर कार्य करेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.