HW News Marathi
राजकारण

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई। शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. विनायक मेटेंना जखमी अवस्थेत कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी विनायक मेटेंना मृत घोषित केले.
विनायक मेटे हे आज (१४ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईच्या दिशेने येत होते.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. यात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. विनायक मेटे हे त्यांच्या बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.या अपघातात विनायक मेटे यांचा मृत्यू झाला तर त्यांचा बॉडीगार्ड आणि त्यांच्या गाडी चालक यांना देखील गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी चर्चेसाठी शरद पवारांच्या निवासस्थानी

News Desk

काश्मीरमधील ३ फुटीरवादी नेत्यांना १० दिवसांची एनआयए कोठडी

News Desk

२०१९ च्या लोकसभा निवणुकांमध्ये ‘हा’ असेल भाजपचा नवा नारा

News Desk