नवी दिल्ली | ‘चार पिढ्या राज्य करणाऱ्यांनी आपल्या कामाचा हिशोब दिला पाहिजे. पण ते चार वर्षे काम करणाऱ्यांकडे हिशोब मागत आहेत’, असा टोला लगावत पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस नेते शशी थरुर यांना प्रत्युत्तर दिले आहे. छत्तीसगढमधील अंबिकापूर येथे झालेल्या सभेत आज ते बोलत होते. छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. नरेंद्र मोदींनी आज अंबिकापूर येथे सभा घेतली. या सभेदरम्यान पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली.
Pai-pai ka hisaab dena chahiye ki nahi dena chahiye? Ek hi parivaar ki chaar peediyon ne desh ko kya diya? Ek chaiwale ne chaar saal mein kya diya…Aao ho jaaye muqabala: PM Narendra Modi addressing a public meeting in Shahdol, #MadhyaPradesh pic.twitter.com/KQUZJld2RI
— ANI (@ANI) November 16, 2018
‘नेहरूंमुळे चहावाला पंतप्रधान झाला असे हे लोक सांगत आहेत. असे असेल तर मग पाच वर्षांसाठी गांधी घराण्याबाहेरच्या एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षाचा अध्यक्ष करा’, असे खुले आव्हान मोदींनी काँग्रेसला दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘सरकारने नेहमी गरिबांसाठी काम करायला हवं. आमचं सरकार कोणताही भेदभाव न करता नेहमीच सगळ्यांसाठीच काम करते. अटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगढ, उत्तराखंड आणि झारखंडची निर्मिती केली. त्यावेळी कोणतंही आंदोलन झालं नव्हतं. पण काँग्रेसनं केवळ तेलंगणाची निर्मिती केली त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळं आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला मोठा फटका बसला.’
मी दररोजच सरकारनं चार वर्षांत केलेल्या कामाचा हिशेब देतो. पण एक चहावाला पंतप्रधान कसा झाला, या विचारानं काही लोक रोज रडगाणं गातात. मुळात एक चहावाला इतर कुणामुळेही पंतप्रधान झाला नाही, तर सवाशे कोटी भारतीयांमुळेच चहावाला पंतप्रधान होऊ शकला, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. भ्रष्टाचाराविरोधातील माझी लढाई सुरुच राहील. तुमच्या चार पिढ्यांनी काहीच केलं नाही. मग आम्ही चार वर्षांत काय केलं, असा प्रश्न का विचारत आहात ?, असा सवालही पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसला केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.