HW News Marathi
राजकारण

पंतप्रधानांचे फक्त दोनच व्यक्तींवर प्रेम, पहिले गांधी-नेहरु आणि दुसरा मी ! 

बारामती । “पंतप्रधान ७ वेळा महाराष्ट्रात आले. इथे बोलताना त्यांनी दोनच गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे गांधी-नेहरू घराण्याने काय केले आणि दुसरी म्हणजे अर्थातच त्यांचे माझ्यावर असलेले ‘प्रेम’ ! हे प्रेम ते जाहिरपणे अनेक सभांमधून व्यक्त देखील करतात” असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भोर येथील सभेत ते बोलत होते.

“खरे तर नेहरू-गांधी घराण्याने आणखी किती त्याग करायला हवा होता ? या कुटुंबातील दोन पंतप्रधानांची हत्या झाली. या घराण्याच्या कर्तृत्वाबद्दल अनेक गोष्टी आहेत. पाकिस्तानने आगळीक केली तर एका महिला पंतप्रधानांने पाकिस्तानला अद्दल घडवली होती. पाकिस्तानचा पराभव करून दोन तुकडे देखील केले होते. मात्र सैन्याच्या शौर्याच कधी भांडवल नाही केले”, असे शरद पवार म्हणाले.

“मी प्रथम आमदार झालो तेव्हा फोन मिळाला. बारामतीला संपर्क करायचा तर ट्रंक कॉल बुक करावा लागायचा. त्यासाठी ५-६ तास थांबावं लागायचं. आज चित्र बदललं. शेतात खुरपं घेतलेल्या स्त्रियाही मोबाइलवर बोलताना दिसतात. ही दळणवळण क्रांती राजीव गांधींनी आणली. तरी मोदी म्हणतात यांनी काय केलं ?महाराष्ट्रात आधीच्या मुख्यमंत्र्यांनी कारखानदारी, उद्योगधंदे वाढवलेत म्हणून महाराष्ट्रात रोजगार वाढला आहे. हे आताच्या मुख्यमंत्र्यानी विसरु नये”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

“माझे बोट पकडून या सगळ्या गोष्टी देशाचे पंतप्रधान करत असतील तर मला माझे बोट डॉक्टरांना निश्चित दाखवावे लागेल”, असा टोला सुद्धा शरद पवार यांनी मोदींना लगावला. सातारा येथे झालेल्या सभेत अमित शहा आणि आज नरेंद्र मोदी, शरद पवारांनी भाजपच्या नेत्यांवर टिकेची झोड उठवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर राज ठाकरेंच्या सभेला मिळाली परवानगी

News Desk

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक केले नाही”, नितेश राणेंची टीका

Aprna