June 26, 2019
HW Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी-भाजपला हुकूमशाही माध्यमातून सत्ता उपभोगायची आहे !

मुंबई | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या सोलापूर दौऱ्यादरम्यान विरोधी घोषणा दिल्या म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासह यामागील प्रमुख सूत्रधाराच्या शोध घ्यावा”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली आहेत.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी विरोधी घोषणा देणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ज्या अमानुषपणे मारहाण केली ती मानवाधिकाराची पायमल्ली आहे. शिवाय महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी ही घटना आहे. या प्रकरणातील पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच या प्रकरणामागे असलेल्या प्रमुख सूत्रधारांचा शोध घेतला जावा, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली.

पंतप्रधान मोदी-भाजपला हुकूमशाही माध्यमातून सत्ता उपभोगायची आहे !

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला हुकूमशाही माध्यमातून सत्ता उपभोगायची आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना साम, दाम, दंड, भेद, यांच्या साहाय्याने संपविणे हे त्यांचे धोरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली घटनात्मक अधिकार नाकारले जात आहेत. सोलापूर येथे घडलेल्या प्रकारातून हेच सिद्ध होते. मानवाधिकार आयोगाने आणि महाराष्ट्र पोलिसांनीही या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता न्याय करावा आणि घटनात्मक अधिकारांचे रक्षण करावे”, अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

Related posts

राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेसचा सरकार स्थापन करण्याचा दावा

News Desk

विरोधकांना देशद्रोही मानणे ही भाजपची परंपरा नाही !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा

News Desk