HW News Marathi
राजकारण

संजय राऊतांच्या सुनावणीदरम्यान PMLA न्यायालयाने ‘या’ कारणामुळे ED ला फटकारले

मुंबई | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) जामीन मंजूर केला आहे.  न्यायालयात आज (9 नोव्हेंबर) राऊतांच्या जामीना अर्जावर  झालेल्या पार पडली. यावेळी न्यायालयाच्या कॉपीत ईडीला फटकारले आहे. ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडले आहे. ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत केलेली अटक ही बेकायदेशीर आहे, असे म्हणत पीएमएलए न्यायालयाने ईडीला चपराक लगावली आहे.

पीएमएलए न्यायालयाने म्हणाले, “122 पानाचे ऑर्डर दिलेले आहे. यातील 120 पानावर लिहिलेले आहे की, 153 पाईटवर नमुद केलेल आहे. न्यायालयाला असे वाटते की, ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत बेकायदेशीर अटक केलेली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राकेश आणि सारंग वाधवान त्यांच्यासोबत सरकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी त्यांचीही जबाबदारी होती. 2006 ते 2018 सालापर्यंत ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. तर या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई का?, झालेली नाही. ईडीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत या दोघांना केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. , असा सवाल न्यायालयाने उपस्थित करत ईडीच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

संजय राऊत आणि प्रवीण राऊतांवर ईडीने नेमके काय केले आरोप

या प्रकरणात प्रवीण राऊत हे मुख्य आरोप असल्याचा दावा ईडीने केले आहे. प्रवीण राऊतांनी संजय राऊतांच्या सांगण्यावरून सगळे केलेले आहे. या प्रकरणाचे संजय राऊत हे मास्टर माईट असल्याचे ईडीने पहिल्यापासून दावा केला आहे. या प्रकरणातील सर्व घडामोडी संजय राऊतांच्या सांगण्यावरून घडत असल्याचा आरोप ईडीने सांगितले. गोरेगाव येथील पत्राचाळचा 47 एकरच्या जागा गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीने जी काही मनी लाँड्रिंग केली आहे. या कंपनीला चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या प्रकरणात संजय राऊत स्वत:चे नाव वाचवण्यासाठी प्रवीण राऊत यांना पुढे केले होते. या घोटाळ्यात प्रवीण राऊत जे काही केले ते संजय राऊत यांच्या सांगण्यावर करत होते.

संबंधित बातम्या

संजय राऊतांचा जामीन स्थगित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन मंजूर

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभ्रमंती करून हाती काही नाही !

News Desk

प्रश्न इतकाच आहे की, विखे जाणार कुठे ?

News Desk

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

Aprna