नवी दिल्ली | “भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करून पुन्हा एकदा भारताची शक्ती दाखविली. मात्र, काही पक्ष हवाई दलाच्या या शौर्यावर शंका उपस्थित करीत आहेत. या लोकांना केवळ राजकारण करायचे आहे. या लोकांपासून सावध राहा. आज संपूर्ण जग पाकिस्तानवर दबाव टाकत आहे. मात्र, भारतातील या काही लोकांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मदत होत आहे”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते शुक्रवारी (८ मार्च) कानपूर येथील प्रचारसभेत बोलत होते.
PM Modi in Kanpur: Desh mein ekta ka vatavaran banaye rakhna bahut ahem hai. Lucknow mein kuch sirphire logo ne hamare Kashmiri bhaiyon ke sath jo harkatein ki thi uss par UP sarkar ne turanth karwayi ki. pic.twitter.com/wepqoY6kfU
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 8, 2019
“देशात एकता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही माथेफिरू लोकांनी काश्मीरी नागरिकावर केलेला हल्ला हा निंदनीय आहे. उत्तर प्रदेश सरकारने या माथेफिरू लोकांविरुद्ध कारवाई केली असून असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत”, असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला आहे. ते लखनऊमध्ये एका काश्मिरी नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.