HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींनी कधीच चहा विकला नाही, हा तर सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार आपण चहा विक्रीचा व्यवसाय केल्याचे सांगतात. माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ४३ वर्षे मैत्री होती. मी त्यांना कधीही चहा विकताना पाहिलेले नाही. केवळ आपल्याला लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून केलेला हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे.

भय्याजी जोशी यांनी पुढच्या पाच वर्षात राम मंदिर बांधले जाणार नाही असे म्हटल्याचे, प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे. भाजप आणि आरएसएसने देशातील लोकांना अंधारात ठेवले मात्र आता देशातील हिंदू जागे झाले असून ९ फेब्रुवारीला हिंदूंच्या नव्या पक्षाची घोषणा होणार असून या पक्षाला संसदेत विजय मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंदिराचे बांधकाम सुरू होईल, असे प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संविधानाला कोणताही धोका नाही- आठवले

News Desk

भाजपच्या राज्य कार्यकारिणीकडून एकनाथ खडसेंना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी

News Desk

#LokSabhaElections2019 : ‘बेरोजगार हार्दिक पटेल’, भाजपच्या प्रचार मोहिमेची उडविली खिल्ली

News Desk