HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

२ वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांचे प्रचार आता ऐन रंगात आले आहेत. येत्या ९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी औसा येथे एका मंचावर दिसतील. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने कायमच पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे. मात्र, आता प्रचाराच्यानिमित्ताने हे दोन्ही नेते एका मंचावर दिसतील.

शिवसेनेवर गेली ५ वर्षे भाजपसोबत सत्तेत असूनही कायमच विरोधकांची भूमिका बजावली आहे. वारंवार पंतप्रधान मोदींवर ‘सामना’मधून सडकून टीका देखील केली आहे. मात्र, भाजप-शिवसेनेच्या युतीच्या घोषणेनंतर भाजप तसेच पंतप्रधान मोदींप्रती शिवसेनेची भूमिका बऱ्यापैकी मवाळ झाल्याचे जाणवत आहे. ‘मिशन शक्ती’नंतर शिवसेनेने ‘सामना’मधून पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे. दरम्यान, हे दोन नेते मंचावर आल्यानंतर नेमके काय बोलणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Related posts

शिवाजी पार्कवर सभा घेण्यास ओवेसींना परवानगी मिळते, मग राहुल गांधींना का नाही ?

News Desk

रशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

News Desk

#LokSabhaElections2019 : पवारांची विधाने दुर्दैवी, मी माझ्या मुलाविरोधात प्रचार करणार नाही !

News Desk