HW Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय बोर्डाच्या ३ तासांहूनही अधिक काळ चाललेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

पंतप्रधान मोदी ओडिसाच्या पुरीमधून निवडणूक लढतील, अशी देखील चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रदान मोदी गुजरातमधील वडोदरा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आपच्या अरविंद केजरीवाल यांचा ७१ हजार मतांनी पराजय केला होता. पंतप्रधान मोदींना त्यावेळी एकूण ५ लाख ८१ हजार मते मिळाली होती.

Related posts

रक्ताचा माणूस आपला राहू नये इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होते !

News Desk

आज दसरा मेळाव्यात काय बोलणार उद्धव ठाकरे?

News Desk

शेताच्या बांधावर जाऊन अजितदादांचा शेतक-यांशी वन टू वन

News Desk