HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शिवरायांच्या भूमीतले असूनसुद्धा जनतेला फसवून पवारांना झोप कशी लागते ?

अहमदनगर | “तुम्ही देशासाठी काँग्रेस पक्ष सोडला होता ना ? मग आता पुन्हा त्यांच्यासोबतच का ? ‘राष्ट्रवादी’ असे आपल्या पक्षाचे नाव ठेऊन देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत जाऊन तुम्ही जनतेला फसवत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील असूनसुद्धा असे करून तुम्हाला झोप कशी येते ?”, असे प्रश्न विचारत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१२ एप्रिल) अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या प्रचारसभेत उपस्थित होते. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते.

“अहमदनगरच्या भूमीने देशाला ताकद दिली. काँग्रेसच्या कार्यकाळात प्रत्येक दिवशी घोटाळे झाले. काँग्रेसच्या कार्यकाळात देशातील अनेक शहरात बॉम्बस्फोट होत होते. काँग्रेसचे सरकार संपूर्ण जगातील कमकुवत सरकार होते. पाकिस्तानसमोर देखील कमकुवत होते. मात्र, आमच्या सरकारने दहशवादाविरोधात कठोर पावले उचलली. त्यामुळे आता नागरिकांनीच असा प्रण केला आहे कि, काँग्रेसला पूर्णपणे हटविले तरच देशाचा विकास होऊ शकतो”, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Related posts

ममता ‘बंगालदुर्गा’ तर पंतप्रधान मोदी ‘महिषासुर’ !

News Desk

महिलांना 33 टक्के आरक्षण मिळायला हवे

News Desk

सवर्ण आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यावर शंका | शरद पवार

News Desk