HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय गुजरात दौरा

अहमदाबाद | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २१ ते २२ डिसेंबरला गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्यातील पोलीस प्रमुख्यांच्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार असल्याची माहित मिळाली आहे. तसेच भाजपच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित करणार असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलीस महानिदेशक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय संमेलन गुरुवारपासन (२० डिसेंबर) सुरू होत आहे. नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत २० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय संमेलनाचा शुभारंभ होणार करण्यात येणार आहे. मोदी शुक्रवार (२१ डिसेंबर) या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

News Desk

अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपायला हवा !

News Desk

एकनाथ शिंदेंनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Aprna