June 26, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली | अब्दुल्ला

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहे. लोकसभेसोबतच देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची देखील घोषणा देखील करण्यात आली आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये मात्र सुरक्षेच्या कारणास्तव विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. आयोगाच्या या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

“आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मरीच्या विधानसभा निवडणुकीकडे लागेल असताना. मात्र  मी कधीच विचार नव्हात केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली आहे,” असे ट्विट करत ओमर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय सुरक्षा हाताळणीचे बालाकोट आणि उरी हे प्रतिक नसून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती त्यांनी आणखीनच बिघडवली आहे. आता तर विधानसभा निवडणुका पुढे ढकलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, दहशतवादी आणि हुर्रियतसमोर शरणागती पत्करली असल्याचा आरोप ओमर यांनी ट्विटच्या मधून केला आहे. १९९६ पासून पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका वेळेत होणार नाहीत.

 

Related posts

शहा, उद्धव बैठक अखेर संपली, दोन तास झाली दोघांमध्ये चर्चा

धनंजय दळवी

अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर !

News Desk

पंतप्रधान मोदी आज अयोध्येत, धार्मिक स्थळांपासून दूर राहण्याची शक्यता

News Desk