HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात

नांदेड | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर भाजपविरुद्ध प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वीर भगत सिंग हे तुरुंगात असताना काँग्रेसचे कोणीही त्यांना भेटालाय गेले होते का ?, असा सावाल त्यांनी विचारले होते. परंतु भगतसिंग तुरुंगात असताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे दोन वेळा भेटायला गेले होते. त्यावेळी पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या १४ वर्षाच्या होत्या. मग तेव्हा भगतसिंग यांना भेटण्याचा संबंध येत नाही. मग मोदींना नक्की कोणत्या गांधींबद्दल बोलायेच आहे. असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे यांनी मोदींवर बोचऱ्या शब्दात टीका केली

 

क्रांतीकारक भगतसिंहांना काँग्रेसच्या नेत्यांनी भेट का घेतली नाही

पंतप्रधान मोदींचं गेल्या वर्षातील एका भाषणाचा काही भाग राज ठाकरेंनी सभेत दाखवला. त्यात मोदींनी क्रांतीकारक भगतसिंहांना तुरुंगात भेटण्यासाठी काँग्रेस परिवारातील एकही नेता गेला नाही, अशी टीका केली होती. यावर बोलताना मोदी देशाला चुकीचा इतिहास सांगत असल्याचे राज म्हणाले. काँग्रेस परिवारातील एकही नेता गेला नाही, म्हणजे नेमके कोण गेले नाही? जवाहरलाल नेहरु गेले नाहीत, सरोजिनी नायडू गेल्या नाहीत की सरदार वल्लभभाई पटेल गेले नाहीत? मोदींना नेमके म्हणायचेय का? असा उलट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले.

पंतप्रधान मोदी आता बोललेच आहेत, तर त्यावेळची एक बातमीचा आधार देत राज ठाकरेंनी उपस्थिताना ‘द ट्रिब्युन’ दैनिकात प्रसिद्ध झालेली एक बातमी दाखवली.या बातमीत भगतसिंह तुरुंगात असताना दोनवेळा त्यांची भेट घेणारे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु हे एकमेव नेते होते, असे राज ठाकरे म्हणाले. नेहरु दोन वेळा भगतसिंहांना तुरुंगात असताना भेटायला गेले होते. ऑगस्ट 1929 मध्ये ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. त्यावेळी इंदिरा गांधी फक्त २४ वर्षांच्या होत्या. त्यामुळे संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधींचा तर प्रश्नच येत नाही, असे म्हणत राज यांनी मोदी सर्रास खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

निवडणुकीच्या प्रचारात विकासाचे मुद्दे नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत प्रचारात स्टार्ट अप इंडिया, मेकिंग इंडिया आणि योग या विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. त्यांच्या भाषणात विकासाचे मुद्दे गायब झाले आहे. मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकरी, दुष्काळ, रोजगार यामुद्यांवर बोलत नाही, असा आरोप राज ठाकरे यांनी नांदेडच्या जाहीर सभेत केला आहे. यानंतर पुढे राज ठाकरे असे देखील म्हणाले की, मोदीं निवडणुकीशी काही संबंधित नसेलेल विषय मांडतात? असे अनेक सवाल उपस्थित करून राज ठाकरेंनी मोदींंवर टीकास्त्र सोडले आहे.

देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या नावे मते

देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या नावे मोदी मत मागत फिरत आहेत. तसेच गुजरातचे खोटे चित्र उभा करून देशाला गंडवल असल्याचा घणाघात त्यांनी केला, नांदेडच्या सभेत राज ठाकरेंनी म्हणाले आहेत. मोदींनी महाराष्ट्रातील लातूरमधील औसा येथे प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने भाजपला मत द्यावे, असे भावनिक आवाहन नवमतदारांना केले. यावर राज ठाकरे यांनी मोदींचा खरपूस समाजार घेतला. तसेत राज ठाकरे राज्यभरात मोदी आणि शहा यांना हरविण्यासाठी प्रचार सभा घेणार आहे. नांदेडची ही निवडणुकीतील पहिली जाहीर सभा होती. पुढे राज ठाकरे अशा८ ते ९ प्रचार जाहीर सभा घेणार आहेत.

 

राज ठाकरेच्या भाषणाची महत्त्वाचे मुद्दे

 

 • त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री हे बसविलेल्या मुख्यमंत्री असल्याचे म्हटले आहे.
 • गोदावरीचे पाणी गुजरातला नेहत आहेत. परंतु राज्याचे मुख्यमंत्र मात्र हाताची घडी घालून बसले आहेत,
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात
 • जेव्हा भगतसिंग तुरुंगात असताना इंदिरा गांधी या १४ वर्षाचा होत्या. मग राजीव गांधी, राहुल गांधी यांचा संबंध येतोच कुठून
 • वीर भगतसिंग हे तुरुगात असताना काँग्रेसचे कोणीही त्यांना भेटालाय गेले होते का ?, असा सावाल त्यांनी विचारले होते. निवडणुकीशी या प्रश्नाचा काही संबंध आहे का? असे अनेक सवाल उपस्थित करून मोदींनी सवाल उपस्थित केला होता.
 • मोदींनी प्रधानसेवक हे जे वाक्य वापरत आहे. ते वाक्य देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांनी  केले होते.
 • व्यापारी त्यांचे काम करतो. परंतु मोदींच्या मनात देशातील जनानांबद्दल काय मत आहे, राज ठाकरेंनी मोदींचा एक जुना व्हिडिओ दाखविला त्या मोदींनी म्हटले की, सैनिकांपेक्षा व्यापारी जास्त साहस असल्याचे म्हणाले होते.
 • देशातील जवानांनी नावे मते मागत फिरत आहेत.
 • मोदी फक्त खोटे बोलत नाहीले, सत्य परिस्थिती जनतेसमोर आली नाही
 • एअर स्ट्राईक बद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी खेटे बोलत आहेत
 • पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे शस्त्रे कोठून आली मोदींनी सांगावे, असे आव्हानच राज यांनी मोदींना दिले.
 • मी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत म्हटले होते की, निवडणुकीच्या तोंडावर मोदीं युद्ध्यजण परिस्थती निर्माण कराणार
 • नरेंद्र मोदींच्या भाषणातील विषय काय ? स्टार्ट अप इंडिया, मेकिंग इंडिया आणि योग याबदल काही बोलत नाहीत
 • १ लाख २० हजार विहरी बांधल्याच्या थापा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मारत फिरत आहेत
 • मराठवाड्यात बाराशे फूट खोल पाणी लागत नाही, ही परिस्थिती अशीच राहील तर पुढच्या ६० वर्षात मराठवाड्याचा वाळंवट होऊल, असे शास्त्रांनी सांगितले.
 • भाजपचे सरकार देशात आल्यापासून केवळ महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केला आहे, शेतकरी गावे सोडून शहरात जात आहेत.
 • मोदींनी महाराष्ट्रातील दौऱ्या आले असताना मराठवाड्यातील तरुण, शेतकऱ्याबदद्ल काही बोले नाही.
 • नरेंद्र मोदींच्या सभेला काळा शर्ट घालून आले म्हणून त्याला बाहेर काढले.
 • उद्योगपती रतन टाटा यांनी सांगितल्यामुळे मी गुजरातला गेलो
 • या देशातील शेतकर, महिला आणि तरुणा फसविले
 • ज्या मानसावर आपण विश्वास टाकला त्यांनी केसानी गळा कापला
 • नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हद्द पार करायचे आहे

 

Related posts

Karnataka Crisis : विधानसभेत आमदारांनी घालविली रात्र, तर आज ठरणार कुमारस्वामींचे भवितव्य

News Desk

ममता बॅनर्जी या हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील !

News Desk

मी शीख समाजात जन्माला आले हीच माझी चूक होती का ?

News Desk