HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मोदींची महाराष्ट्र दौऱ्यातील वर्धा येथे पहिली प्रचार सभा होणार आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी महाराष्ट्रात ८ सभा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी आज वर्धामध्ये प्रचारासाठी येणार आहेत. या प्रत्येक टप्प्यातील मतदानासाठी मोदींच्या २ सभा आयोजित करण्याचा आल्या आहेत. मोदींच्या मुंबईतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धा येथेच घेतली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात निष्ठावंतांना स्थान नाही”, आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

Aprna

#LokSabhaElections2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

News Desk

अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा

News Desk