जयपूर | युपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये सहा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा काँग्रेसने काल (२ मे) पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी केला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ मे) राजस्थानमधील प्रचार सभेतील युपीए सरकारच्या सर्जिकल स्ट्राईकवरून टीका केली.
#WATCH PM Modi in Sikar,Rajasthan: Congress now claims they carried out 6 surgical strikes. What strikes were these about which the terrorists did not get to know, Pak didn't know, even Indians didn't know.. First they mocked ,then protested and now they say 'me too me too.' pic.twitter.com/fyZuY4Ur4P
— ANI (@ANI) May 3, 2019
“काँग्रेसने असे सर्जिकल स्ट्राइक केले की, ते ना दहशतवादी, ना जवानांना आणि ना देशातील जनतेला कुणाला कळाले नाही. तसेच काँग्रेसने आधी सर्जिकल स्ट्राईकचे खिल्ली उडवली आणि आता मी टू मीटू करायला लागले”, असल्याचे मोदींनी म्हणाले आहेत. तसेच पुढे मोदी असे देखील म्हणाले की,“काँग्रेस पूर्वी बोलायची की सर्जिकल स्ट्राईक असे काही नसते. आधी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकची थट्टा मस्करी केली. जेव्हा त्यांना कळाले की जनता मोदीसोबत आहेत. तर त्यांनी विरोध सुरू केला.
PM Modi in Sikar, Rajasthan on Congress's claim that 6 surgical strikes were carried out under UPA government: Jab kagaz par hi karni ho, jab video game mein hi strike karni ho to 6 ho ya 3 ho, 20 hon ya 25 hon, ye jhoote logon ko kya fark padta hai. pic.twitter.com/hJp6shVWdz
— ANI (@ANI) May 3, 2019
तसेच भाजपला जनतेचे वाढते समर्थन पाहता, आता काँग्रेसने देखील युपीए सरकारच्या काळात झालाचा दावा करत देशातील जनतेचे समर्थन त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आहे. आधी थट्टा मग विरोध आता मी टू मी टू. एसी रुमध्ये बसून काँग्रेस कागदाचे सर्जिकल स्ट्राईक करू शकतात. कागद आणि व्हिडीओ गेममध्ये सर्जिकल स्ट्राईक झाले असतील तर ते ६ असो वा ती, २० असो वा २५ हे खोटे बोलणार्या लोकांना काय फरक पडतो असेही मोदी यावेळी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.