HW News Marathi
राजकारण

देशभक्तीला पर्यायी शब्द म्हणजे ‘चौकीदर’ !

नवी दिल्ली | ‘चौकीदर’ हा देशभक्तीला पर्यायी शब्द आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० मार्च) केले आहे. मोदींनी त्यांच्या ट्विटसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यींपासून शिक्षक, शेतकरी आणि विविध क्षेत्रात काम करणारे लोक सुद्धा “मी सुद्धा या देशाचा चौकीदार आहे.” असे म्हणताना दिसत आहेत.

यानंतर मोदींनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली आहे. मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “या लोकांनी चौकीदारांचा अपमान केला. पण आज संपूर्ण देश चौकीदार झाला आहे. चौकीदार हा देशभक्तीला पर्यायी शब्द आहे,’ असे म्हणाले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सुरू केलेल्या ‘चौकीदार चोर है’च्या प्रचार करायला होता. काँग्रेसच्या या प्रचाराला भाजपने प्रत्युत्तर देत ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेनंतर मोदींसह भाजपच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर नावाच्या आधी ‘चौकीदार’ हा शब्द लावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल

Aprna

आजोबांचा अपमान झाला म्हणून सुजयने पक्ष सोडला !

News Desk

#RamMandir : …तर दिल्लीपासून काबूलपर्यंत दंगली घडवू !

News Desk