HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सर्वोच्च न्यायालय | संजय राऊत

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आमचे सर्वोच्च न्यायालय आहेत. कारण, देशातील जनतेनेच राम मंदिराच्या मुद्दावरच मोठ्या बहुमताने त्यांना निवडून दिले आहे. आता अयोध्येत लवकरच राम मंदिर बनेल”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. “आम्ही मोदींचेच ऐकू कारण देशाने त्यांना निवडून दिले आहे. तेच आमचे सुप्रीम कोर्ट आहेत”, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नवनिर्वाचित खासदारांना घेऊन १६ जून रोजी पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहे.

“भाजप वर्षानुवर्षे राम मंदिराचा मुद्दा प्रलंबित ठेऊन त्याच्या नावावर मते मागू शकत नाही. या लोकसभेतील एनडीएचा विजय म्हणजे प्रभू रामचंद्राचा आशीर्वादच. ती मंगल वेळ आता आली आहे. आता पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत लवकरच राम मंदिर उभारण्यात येईल”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. लोकसभेच्या निकालानंतर आता देशात पुन्हा राम मंदिराचा मुद्दा गाजण्यास सुरुवात होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

राजस्थान रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

News Desk

साध्वी प्रज्ञा यांनी केला पक्षाची शिस्त पाळण्याचा संकल्प

News Desk